Wednesday, September 16, 2020

कन्या

 कन्या

                   प्रा.डॉ.साधना निकम 

इवलेसे बोट माझे    

 आई तू सोडू नकोस       

मायेचा पाश हा         

अचानक तोडू नकोस    

गुजगोष्टी कानातल्या     

आई तू विसरू नकोस    

पापण्याआड अश्रू     

आई तू लपवू नकोस   

 जन्मोजन्मीची सोबती मी    

कन्या म्हणून हिणवू नकोस       

मायलेकीचे नाते आपले  

  नाळ जन्माची तोडू नकोस    

कुशीतल्या उबेची     

पदरातल्या छायेची   

  श्वासातल्या श्वासाची    

साथ तू सोडू नकोस    

आई मला मारू नकोस    

आई मला मारू नकोस

Wednesday, September 2, 2020

अस असत प्रेम

 असं असत प्रेम  

सूर्योदयाला विखुरलेल्या

सोनेरी किरणांना

ओंजळीत घेणार

अस असत प्रेम

पात्यावरच्या दवाला

अलगद टिपून

ओठांनी चुंबणार

अस असत प्रेम

खुलणाऱ्या कळीन

गालाला स्पर्शून

व्यक्त होणार

अस असत प्रेम

कोपऱ्यातील एकांतात

नजरेने खुणावत

आश्वासन देणार

अस असत प्रेम

मोरपिसाच्या स्पर्शान

हळुवार खुलणार

एकमेकांना जपणार

अस असत प्रेम

हृदयावर कोरलेल

काळजाला भिडलेल

स्मरणात राहणार

अस असत प्रेम

एकमेकांसाठी आसुसलेल

वचनात अडकलेल

आणाभाका घेणार

अस असत प्रेम.

Sunday, August 23, 2020

प्रेम हे अस असत.

 प्रेम हे अस असत.

प्रेम हे काय असत

प्रेम हे प्रेम असत

कोणी ते व्यक्त करत

कोणाच ते सुप्त असत

कोणाच बोलक असत

कोणाच अबोल असत

प्रेम हे अस असत

गुलाबाने ते खुलत

काट्यासारख खोलवर रुतत

कधी ते रोमांच फुलवत

कधी ते घायाळ करत

अस कस प्रेम असत

दुराव्याने अधिक वाढत

प्रेम हे अस असत

प्रेयसीच्या डोळ्यात दिसत

प्रियकराच मन अधीर करत

प्रेम हे प्रेम असत

मोगऱ्याच्या फुलाने दरवळत

पारिजातकाच्या सुगंधाने पसरत.

प्रेम हे अस असत

प्रेम हे अस असत.        

                      प्रा.डॉ.साधना निकम चाळीसगाव

 

Saturday, August 15, 2020

फक्त तुझ्यासाठी

 

फक्त तुझ्यासाठी

                  प्रा. डॉ. साधना निकम

वेळी अवेळी सांजवेळी

नदीच्या किनारी

थांबत होतो मी

फक्त तुझ्यासाठी

निळ्या नभात

उगवत्या चंद्राची

वाट पहात होतो मी

फक्त तुझ्यासाठी

तारकांच्या नभांगणात

चांदण्यांच्या उजेडात

चंद्राची चांदणी

शोधत होतो मी

फक्त तुझ्यासाठी

किर्र रात्रीच्या

गडद काळोखात

तेजोमय प्रकाशाची

आस लावून बसलो

फक्त तुझ्यासाठी

पहाटेला उगवणाऱ्या

शुक्रतारयाकडे बघत

स्वप्न रचत होतो

फक्त तुझ्यासाठी

उगवत्या सूर्याच्या

सोनेरी किरणांना

ओंजळीत घेत होतो

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी